You are currently viewing डाॅ.सुरज शुक्ला यांची ९ एप्रिल २०२२ रोजी सिंधू प्रसार भारती या आकाशवाणी केंद्रावर लकवा /पॅरलिसीस यासंदर्भात महत्त्वाची मुलाखत

डाॅ.सुरज शुक्ला यांची ९ एप्रिल २०२२ रोजी सिंधू प्रसार भारती या आकाशवाणी केंद्रावर लकवा /पॅरलिसीस यासंदर्भात महत्त्वाची मुलाखत

कुडाळ :

बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरज शुक्ला-एक तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ९ एप्रिल २०२२ रोजी सिंधू प्रसारभारती या आकाशवाणी केंद्रावर सायंकाळी साडेपाच वाजता(५.३०) अर्धांगवायू/ पॅरालिसीस/ लकवा या मेंदू विकारावर फिजिओथेरपी उपचार पद्धतीच्या आधारे कशी मात करता येईल? या संदर्भात मुलाखत प्रसारित होणार आहे. अर्धांग वायू झाल्यावर कोणकोणत्या पद्धतीने उपचार केले जातात ?त्याचे फायदे कोणते होतात?सदर समस्येवर कशा पद्धतीने उपचार केले जातात ?यासंदर्भात माहिती सदर मुलाखतीमध्ये दिली जाणार आहे. लकवा /पॅरलेस या मेंदूविकारातून रुग्णास नॉर्मल अवस्थेमध्ये कसा आणता येईल? याचा सोपा, साधा असा उपचाराचा मार्ग ते या मुलाखतीदरम्यान कथन करणार आहेत.त्यांनी अतिशय अल्पावधीतच अनेक रुग्णांना आजार मुक्त केले आहे. तरी संबंधितांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालय कुडाळ तर्फे करण्यात आलेले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा