भारतीय जवानांची माणुसकी; सीमा पार करून आलेल्या करीम या बालकाला पाकिस्तानी रेंजर्सकडे सुखरुप सुपूर्द केले

भारतीय जवानांची माणुसकी; सीमा पार करून आलेल्या करीम या बालकाला पाकिस्तानी रेंजर्सकडे सुखरुप सुपूर्द केले

अहमदाबाद 

बजरंगी भाईजान चित्रपटात भारतात चुकून आलेल्या मुन्नीला पुन्हा कुटुंबियांकडे पाहोचविण्यासाठी बजरंगी भाईजानला प्राणांची बाजी लावावी लागली. परंतु, भारतीय जवानांच्या माणुसकीमुळे सीमा पार करून आलेल्या करीम याबालकाला पाकिस्तानी रेंजर्सकडे सुखरुप सुपूर्द केले.The humanity of Indian soldiers, Eight-year-old Karim, who came to India by mistake, was handed over to Pakistan Rangers

भारतीय जवानांच्या माणुसकीमुळे सीमा पार करून आलेल्या करीम या बालकाला पाकिस्तानी रेंजर्सकडे सुखरुप सुपूर्द केले.

राजस्थानच्या बाडमेर सेक्टरमध्ये सोमरार सीमा तपास चौकीजवळ हा बालक भारतीय हद्दीत आला होता. सद्भावनेच्या दृष्टिकोनातून भारताने त्याला पाकिस्तानी रेंजर्ससमवेत झालेल्या फ्लॅग मीटिंगमध्ये सुपूर्द केले.

२ एप्रिल रोजी करीम हा चुकून आंतरराष्ट्रीय सीमा पार करून भारतीय हद्दीत आला होता. तो सीमा चौकीजवळ पहाटे पोहोचला होता. भारतीय जवानांनी त्याला पाहिले व परत जाण्यास सांगितले. परंतु वदीर्तील जवानांना पाहून त्याने रडण्यास प्रारंभ केला.

त्यानंतर जवानांनी त्याला खाण्या-पिण्यास दिले. यावर त्याने सांगितले की, तो रस्ता चुकला आहे. त्याचे गाव पाकिस्तानमधील सोमरार असून, त्यापासून तीन किलोमीटरवर तो आढळला होता.बीएसएफ मुख्यालयामधून निर्देश मिळाल्यानंतर पाकिस्तानी रेंजर्ससमवेत तत्काळ फ्लॅग मीटिंग घेण्यात आली आणि बालकाला पाकिस्तानच्या सुपूर्द करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा