अभिनेत्री कल्पना बांदेकर यांची शनिवारी मुलाखत

अभिनेत्री कल्पना बांदेकर यांची शनिवारी मुलाखत

सावंतवाडी

सिंधुदुर्गातील नामवंत अभिनेत्री कवयित्री कल्पना बांदेकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम शनिवार 3 रोजी रात्री नऊ वाजता सिनेपट समूहातर्फे ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहे.
गेली काही दशकं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आघाडीच सर्जनशील नाव म्हणजे कल्पना बांदेकर. संवेदनशील कवयित्री लेखिका म्हणून त्यांचा प्रवास सुरु असताना अनेक आंतरराष्ट्रीय सिनेमा, लघुपट आणि रंगमंचावरील त्यांचा अभिनय प्रवासही तसा थक्क करणाराच आहे. जिल्ह्यातील पहिल्या नेपथ्यकार म्हणून कार्यरत झालेल्या त्या एक कुशल तंत्रज्ञ दिग्दर्शिका आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कल्पना यांच्याकडे आणखीही अनेक कलेचे आणि सर्जनशीलतेचे पैलु आहेतच. त्या सर्व पैलूंची ओळख करून घ्यावयाच्या उद्देशाने सोशल मीडियाच्या सिनेपट फेसबुक समूहाने त्यांच्या कार्याची ओळख व्हावी म्हणून सदर मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

सिनेपट समूहाचे सुयोग पंडित, प्रथमेश परब व केदार रानडे यांनी या मुलाखतीचे आयोजन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा