पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज करण्याची  10 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज करण्याची  10 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी

पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) परीक्षांचे माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी शाळांना दिनांक 10 एप्रिल 2021 पर्यत व्दितीय मुदतवाढ देण्यात आलेली आहे. परीक्षेकरीता ज्या शाळांनी अदयाप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दिनांक 10 एप्रिल 2021 अखेर पर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी. सदरची परीक्षा दिनांक 23 मे 2021 रोजी घेण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी याची नोंद घेऊन आवेदन पत्र भरावीत व परीक्षेच्या तारखेच्या बदलाबाबत संबंधित विदयार्थी व पालकांना अवगत करावे असे आवाहन एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) व अशोक कडूस, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक) यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा