मद्यधुंद बोलेरो चालकाची दुचाकीसह विद्युत खांबाला धडक…

मद्यधुंद बोलेरो चालकाची दुचाकीसह विद्युत खांबाला धडक…

कारिवडे-वझरवाडी येथील घटना; एक जखमी,दोन्ही गाड्यांचे नुकसान…

सावंतवाडी

मद्यधुंद बोलेरो चालकाने दुचाकीला धडक देत पलायन करताना पुन्हा विद्युत खांबाला धडक दिली.हा अपघात आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारिवडे-वझरवाडी येथे घडला.दरम्यान त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी चालकाला चांगलाच चोप दिला.या अपघातात दुचाकीचालक किरकोळ जखमी झाला असून दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मद्यधुंद अवस्थेत बोलेरो चालवताना चालकाची दुचाकीला धडक बसली. दरम्यान अपघातानंतर पलायन करण्याच्या या गडबडीत त्याने पुन्हा काही अंतरावर जाऊन एका विद्युत खांबाला धडक दिली. यात दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला. तर दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान तडजोडीतून प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा