You are currently viewing मालवणात व्यावसायिक वादातून कामगाराला नग्न करून मारहाण; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मालवणात व्यावसायिक वादातून कामगाराला नग्न करून मारहाण; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मालवणात व्यावसायिक वादातून कामगाराला नग्न करून मारहाण; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मालवण :

व्यावसायिक वादातून एका कामगाराला तो राहात असलेल्या अन्य तालुक्यातून घेऊन येत नग्न करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना मालवण चौके येथे घडली आहे. त्या कामगाराला नग्न केल्या नंतर त्याचे व्हिडिओ त्याच्याच मोबाईल मध्ये मारहाणकर्त्यांनी काढले आहेत.

दरम्यान, त्या ठिकाणाहुन संबंधित पिडीत कामगारांची सुटका झाल्या नंतर त्याने आपल्या पत्नीला याबाबत माहिती दिली. तसेच मालवण पोलीस ठाण्यात पिडीत कामगारांने तक्रार दिली. त्यानुसार चौके येथील विनोद सांडव, प्रतीक शिंदे यांसह अन्य जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

चौके येथील विनोद सांडव यांच्या गाडीवर संबंधित कामगार कामाला होता. गाडी त्याच्या ताब्यात होती. मात्र गेले काही महिने कामगार फोन उचलत नाही. कोणताही हिशोब देत नव्हता. या प्रकारातून तो कामगार राहात असलेल्या अन्य तालुक्यातील गावातून त्याला उचलून आणून चौके येथे डांबून ठेवण्यात आले. त्याला नग्न करून मारहाण करण्यात आली. त्याच्याच मोबाईल मध्ये त्याचे व्हिडिओ करण्यात आले.

पिडीत कामगारांने दिलेल्या तक्रारीनुसार चौके येथील विनोद सांडव, प्रतीक शिंदे यांसह अन्य जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विनोद सांडव यांनीही संबंधीत कामगार आपल्याला धमकी देत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे.

कामगाराला नग्न करून मारहाण झाली हा गंभीर प्रकार आहे. तसेच त्या कामगाराला ज्या तालुक्यातील गावातून उचलून आणले. हे अपहरण आहे. त्या गावच्या हद्दीतील पोलीस ठाण्यातही याबाबत संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल व्हावा. अशी मागणी पिडीत कामगाराच्या मित्र परिवाराकडून केली जात आहे. पोलीस प्रशासनाने यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.

संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा