निरवडे रक्तदान शिबिरात ३७ रक्तदात्त्यांनी रक्तदान केले …

निरवडे रक्तदान शिबिरात ३७ रक्तदात्त्यांनी रक्तदान केले …

सावंतवाडी

शिवशक्ती कला क्रीडा मित्र मंडळ कोनापाल आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने निरवडे- कोनापाल येथे रक्तदान शिबिर पार पडले.

शिबिराचे उद्धघाटन सरपंच प्रमोद गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रकाश तेंडुलकर, डॉ.मस्के,डॉ. दिप्ती बुवा, प्राजक्ता रेडकर ब्लड बँक टेक्निशियन,मानसी बागेवाडी स्टाफ नर्स, अस्लंम शेख ड्रायव्हर , खाडे असिस्टंट.

संजय शेटकर,आबा नाईक,संदीप बाईत,सदस्य अर्जुन पेडणेकर, संजय तानावडे, मुख्याध्यापक फोंडेकर उपस्थित होते.

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हणत कार्यक्रमाला सुरवात केली.कोणत्याही व्यक्तीला रक्ताची आवश्यकता असल्यास त्वरित रक्त दिले जावू शकते ते केवळ रक्तदान शिबिरामूळे, असे सांगताना त्यांनी रक्ताची गरज भासल्यास संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा