You are currently viewing माझो गाव

माझो गाव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम मालवणी कविता*

 

*माझो गाव*

 

मोती तळ्याच्या भोवती वसलो आसा माझो गाव

निसर्ग सौंदर्यान नटलो न्हालो तेचा सुंदरवाडी नाव

 

येशीर उभो राखणेक देव उपरलकराचो चाळो

शंभर फूट उच कळस भितूर उभो इठ्ठल काळो

 

आत्मेश्वर तळयेचा व्हावता जमनी वयल्यान पाणी

आजुन आठावतत शिळवणीतली काकू पडत्याची गाणी

 

तळ्याच्या काठार ऐटीत उभो राजाचो राजवाडो

देव पाटेकर शहरावयल्या संकटाक घालता आडो

 

पूर्वेक राखण सह्याद्री, पश्चिमेक सावली नरेंद्राची

मारुतीच्या पायाखालसून व्हावता धार अमृताची

 

नरेंद्र डोंगर करता वाडीच्या माथ्यार ढगांची गर्दी

पावसाचे थेंब देतत मोती तळ्यात मोत्यांची वर्दी

 

येगयेगळी फुला माळतत झाडा भोसले उद्यानातली

“वाडी भूल पाडी” अशीच आसा भावना मनामनातली

 

© दीपी [दीपक पटेकर]

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा