You are currently viewing होळी

होळी

ती मजा आज नाय रवली
पुरणपोळी खायचे
शिरवाळे रस ओढायचे,
गावभर होळी फिरवन
रात्री होळी पेटवायचे
रंग उडवायचे,,,
लाल, पिवळे, काळे निळे व्हायचे
रंग टिकासाठी तेच्यात
बोन्डवाचो रस पिळायचे,,,
सोंगा यायची….
“शबय शबय” आरडायची
“आयण्याचा बायना…
घेतल्याशिवाय जायना”
म्हणून दाबात सांगायची,,,
फुटक्या पत्र्याच्या डब्यार
काटये बडवायची,,,,
त्या डब्याच्या आवाजातही
लय सुरात गायची,,,
बापायांका पाताळ घालून
पावडर लाली लावून
राधा यायची
न हलणारी कंबारही
लय जोशात मुरडायची,,,
नखरे करीत गोमू नाचायची
एक दोन रुपयांवर
लय खुश होऊन जायची,,,
कापडखेळे यायचे
खेळ खेळायचे
बेभान होऊन तालार
आनंदानं नाचायचे,,,
मानकऱ्यांचा रोम्बाट
निशाण घेऊन मानानं
गावभर फिरायचा,,,
आणि,,,
शेवटच्या दिवशी
कळस घेऊन गावकर
गावाक न्हावण घालायचो
भक्तिभावानं काळसाची
लोक पूजा करायचे,,,
मजा मजेत शिमग्याची
सांगता करायचे….

दिपी…
(दीपक पटेकर)
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × five =