कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांच्या वडिलांचे निधन

कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांच्या वडिलांचे निधन

आईच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी वडिलांचे देहावसान: तळेकर कुटुंबावर शोककळा.

कणकवली / प्रतिनिधी :-

कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांचे वडील नंदकुमार तळेकर यांचे आज ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री ०३:०० वाजता निधन झाले. तीन दिवसांपूर्वीच आईचे निधन झाल्यानंतर वडिलांच्या झालेल्या निधनाने तळेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नंदकुमार तळेकर हे ६५ वर्षे वयाचे होते त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते दरम्यान ९ सप्टेंबर रोजी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.त्यांच्या पश्चात मुलगा सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा