You are currently viewing ‘उंबर्डे कुंभारवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

‘उंबर्डे कुंभारवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

कुंभारवाडीसाठी आवश्यक असलेल्या कामासाठी आपण सकारात्मक..! – नासीर काझी

वैभववाडी

उंबर्डे कुंभारवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन वैभववाडी तालुका भाजपा अध्यक्ष नासिर भाई काझी यांच्या हस्ते संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला सरपंच शेरपूद्दीन बोबडे सर उपसरपंच  दशरथ दळवी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी तंटामुक्ती अध्यक्ष रत्नकांत बंदरकर सोसायटी चेअरमन धर्मरक्षी जाधव उपस्थित होते. त्यानंतर सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या वेळी  बोबडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुंबई मंडळ व ग्रामस्थ मंडळ यांची प्रत्येक कामाविषयी असलेली तळमळ मांडली व गरज असलेल्या विकासकामांची यादी नासिर भाई काझी यांना सांगितली. तसेच 25 15 मधून मंजूर झालेला रस्ता व नळ पाणी योजना दुरुस्ती, अंगणवाडी नळपाणी योजना मंजूर झाल्याचे सांगितले. त्यानंतर  नासीर भाई यांनी आमदार नितेश राणे यांच्या कार्याची महती लोकांना सांगितली व कुंभारवाडी साठी आवश्यक असलेल्या कामासाठी आपण सकारात्मक असल्याचे जाहीर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पाटील यांनी केले व आभार श्री श्रीपत धामणकर यांनी मांडले. या कार्यक्रमाला वाडीतील सर्व मंडळी व मुंबईकर मंडळी उपस्थित होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 6 =