You are currently viewing ‘वुई फॉर यू’ संस्थेतर्फे सागरेश्वरला स्वच्छता मोहीम…

‘वुई फॉर यू’ संस्थेतर्फे सागरेश्वरला स्वच्छता मोहीम…

वेंगुर्ले

‘वुई फॉर यू’ संस्थेतर्फे वेंगुर्ले सागरेश्वर समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आठवडय़ातील एक दिवस विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याचा संस्थेचा मनोदय आहे. संस्थेचे अध्यक्ष ॲड.संकेत नेवगी, सचिव ॲड. स्वप्नील कोलगावकर, उपाध्यक्षा संपदा तुळसकर, ॲड. श्रद्धा राऊळ, खजिनदार मिहिर मोंडकर, युगा नाईक आदी या मोहिमेत सहभागी झाले होते.पर्यटन स्थळे व आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, स्वतः पासुन सुरुवात करुया आणि आपल्या कोकणचे सौंदर्य जपुया, जास्तीत जास्त युवकांनी या मोहिमेत सहभागी व्हा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले. संस्थेतर्फे अलिकडेच अणसूरपाल येथे महिला दिनानिमित्त महिला बचतगटाना मार्गदर्शनही करण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + eighteen =