You are currently viewing हुक्क्यामध्ये गांजा कुठे आहे?

हुक्क्यामध्ये गांजा कुठे आहे?

फॉरेन्सिक अहवालात निकोटिनसह विविध फ्लेवर असल्याचे स्पष्ट

पुणे

शहरातील हॉटेल्समध्ये सुरू असलेल्या हुक्क्यामध्ये फक्त निकोटिनसह विविध फ्लेवर असल्याचे फॉरेन्सिक विभागाने सांगितले. हुक्क्यामध्ये अमली पदार्थ विशेषतः गांजा आढळल्यास संबंधित हॉटेल चालकाला एक लाख रुपये दंड आणि दहा वर्षे शिक्षेची तरतूद आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांत हुक्क्यामध्ये अशा प्रकारचे अमली पदार्थ आढळलेच नसल्याचा निर्वाळा ‘फॉरेन्सिक’ विभागाने दिला आहे. शहरात कोणकोणत्या हॉटेल्समध्ये हुक्का सुरू आहे याची यादीच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दाखविली होती. त्यानंतर सर्वच पोलिस ठाण्यातील निरीक्षकांनी शहर पिंजून काढून हुक्का सुरू असलेल्या हॉटेल्सना तोंडी व लेखी तंबी दिली.

तर काहींनी हॉटेल्समध्ये व हर्बलच्या नावाखाली सुरू असलेल्या हुक्का पार्लरमधील नुमने पडताळण्यासाठी गृह विभागाच्या ‘फॉरेन्सिक’मध्ये पाठविले. या संदर्भात तेथे चौकशी केल्यानंतर हुक्क्यामध्ये निकोटिनसह विविध फ्लेवर असल्याची माहिती समोर आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा