You are currently viewing राजकीय वाद निवडणुकी पुरतेच, छत्रपतींचा पुतळा सूचित केलेल्या जागीच स्थलांतर होईल

राजकीय वाद निवडणुकी पुरतेच, छत्रपतींचा पुतळा सूचित केलेल्या जागीच स्थलांतर होईल

भाजपा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास

कणकवली

कणकवली शहराच्या इतिहासात अशी सर्वपक्षीय बैठक पहिलीच होत असावी.आता जनतेमध्ये विश्वास निर्माण होईल.पालकमंत्री,सर्व पक्षीय आणि नागरिक मिळून एकत्र निर्णय घेण्यात येईल,छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सूचित केलेल्या जागी स्थलांतरित केला जाईल.असे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगितले .
भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले, नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ही बैठक घेतली.त्यांनी सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांना एकत्र आनले, आमचे राजकीय वाद निवडणुकी पुरतेच आहेत.गाव,शहर,तालुका,जिल्हा आणि ,राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र येतो हे आज पाहिले.छत्रपतीचे राज्य म्हणजे रयतेचे राज्य आहे.कणकवली म्हणजे संवेदनशील शहर आहे.त्यामुळे
तांत्रिक दृष्टीने विचार करावा.शासनाची 23 गुंठे जमीन आहे म्हणजे ती लगेच मिळेल काय ? त्यामुळे तुम्ही जो निर्ण घेतला पाहिजे तो आधी घ्या. पुतळा स्थलांतरित करण्या मागे वाद करणारे कोण आहेत ? वाद करणारेच आम्ही एकत्र आलेलो आहोत.असे सांगताच सर्वांनी टाळ्या वाजवून त्याच्या म्हणण्याचे समर्थन केले.
कणकवली शहरातील नागरिकांनी व्यक्त केलेल्या मतांचा आदर केला पाहिजे.माझा आग्रह आहे,सकल मराठा समाजाचे मंडळ जागृत आहे,त्यांनी जी जागा सुचवली आहे.तांत्रिक दृष्टीने विचार केला पाहिजे.छत्रपतींचा पुतळा स्थलांतरसाठी तुम्ही जो निर्णय दिला,तो घेतला पाहिजे,त्या जागी भव्य स्मारक करायचे असेल त्या ठिकाणी आमदार म्हणून मी पाठपुरावा करेन.जनतेचा प्रश्नांसाठी एकत्र येणे,हे हिताचे आहे,असे मत आ.नितेश राणे यांनी व्यक्त केले.

आमदार वैभव नाईक म्हणाले, तात्पुरता स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथे स्थलांतर करायचा आहे त्यास हरकत नाही मात्र अधिकृत पुतळा स्थलांतरित झाला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करूया असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा