You are currently viewing वाचन छंद प्रेमी, साहित्य समूह प्रस्तुत : ‘क्रांतीसूर्य’ उपक्रमाचे सन्मान पत्र वाटप..! 

वाचन छंद प्रेमी, साहित्य समूह प्रस्तुत : ‘क्रांतीसूर्य’ उपक्रमाचे सन्मान पत्र वाटप..! 

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त, दि. १४ ते १५ एप्रिल रोजी दोन दिवसीय उपक्रम घेण्यात आला. दरम्यान, ‘वाचन छंद प्रेमी साहित्य समूह’ आयोजित, ‘क्रांतीसूर्य’ उपक्रमास, लेखक-साहित्यिकांनी भरघोस प्रतिसाद देऊन, विविधांगी लिखाण सादर केले.

‘क्रांतीसूर्य’ उपक्रमाचे परिक्षण, दैनिक साहित्य पंढरी’ मुख्य संपादिका, वैशाली पडवळ ( एंजल वैशू) यांनी केले. यावेळी, मा. स्वाती कुळकर्णी, सौ. रेखा देशमुख,अमरावती.तसेच मा. अस्मिता अशोक यांना ‘सर्वोत्कृष्ट’ तर, शाहीर मनोहर पवार (चिखली केळवदकर), सुभाष उमरीकर, डॉ. चंद्रशेखर मुळे, विजय बोचरे, सेजल सस्ते (वाशीम) सौ. मालती चव्हाण, न. भा. कोहळे, मा. गणेश निकम, श्री अशोक वाघमारे पुणे, प्रा. पी. एस. बनसोडे यांना, ‘उत्कृष्ट’ लिखाण केल्या बद्दल, सन्मान पत्र देण्यात आले.

दरम्यान,’वाचन छंद प्रेमी’साहित्य समूह, संस्थापक बबनराव वि.आराख यांनी, सर्व साहित्यिकाचे आभार व्यक्त करत, साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा