आंबोली नांगरतास येथे महाकाय जंगली हत्तीचे दर्शन…

आंबोली नांगरतास येथे महाकाय जंगली हत्तीचे दर्शन…

आंबोली
आंबोली नांगरतास येथे आज सकाळी ७ च्या सुमारास महाकाय रानटी हत्ती रस्ता ओलांडताना निदर्शनास आला. काही वेळ हा हत्ती रस्त्यावरच ठाण मांडून उभा होता. त्यामुळे वाहनधारकांची भीतीने चांगलीच गाळण उडाली. आंबोली सरपंच बाळा पालेकर यांच्या घरालगत हा प्रकार घडला. काही जणांनी या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले. जंगली हत्तींचा वावर पुन्हा एकदा दिसून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा