You are currently viewing कुडाळ शहर युवासेनेच्या वतीने मोफत पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीर

कुडाळ शहर युवासेनेच्या वतीने मोफत पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीर

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

२६ मार्च ते ६ एप्रिल रोजी कुडाळ क्रिडासंकुल येथे आयोजन

कुडाळ शहर युवासेना व पवन स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर शुक्रवार दि. २६ मार्च ते ६ एप्रिल २०२१ या कालावधीत सायंकाळी ४ ते ६ वा. पर्यंत कुडाळ येथिल क्रिडासंकुल (तहसील कार्यालया शेजारी ) येथे घेण्यात येणार आहे.

पोलीस भरती व सैन्य भरतीच्या होऊ घातलेल्या परीक्षांसाठी मेहनत घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मैदानी व लेखी परीक्षांबाबत योग्य मार्गदर्शन व्हावे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी पोलीस व सैन्यात भरती व्हावेत.यासाठी हे मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात प्रसिद्ध ॲथलॅटिक व नामवंत प्रशिक्षक अनिकेत पाटील (मुंबई)  हे मार्गदर्शन करणार आहेत.
तरी पोलीस भरती व सैन्य भरतीत सहभागी होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मोफत असलेल्या या पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीराचा लाभ घ्यावा व नाव नोंदणीसाठी अनिकेत पाटील- ९५९४३१८७९५, मंथन पेडणेकर-९९६७९६११३५, गोट्या चव्हाण-९५१८९४३८४७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर व युवासेना कुडाळ शहर प्रमुख कृष्णा तेली यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + nine =