You are currently viewing पद्मश्री माणिक वर्मा यांना सांगीतिक मानवंदना

पद्मश्री माणिक वर्मा यांना सांगीतिक मानवंदना

पद्मश्री माणिक वर्मा यांना सांगीतिक मानवंदना;

सावंतवाडीत ‘माणिक मोती’ विशेष मैफिलीचे आयोजन

सावंतवाडी :

ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्यानिमित्त सावंतवाडीत विशेष संगीत मैफिल ‘माणिक मोती’चे आयोजन करण्यात आले आहे. या मैफिलीत त्यांच्या अजरामर गीतांचा सुरेल नजराणा रसिकांना अनुभवता येणार आहे.
ही विशेष संगीत मैफिल शनिवार, दि. १६ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता राणी पार्वती देवी ज्युनियर कॉलेज (RPD) सभागृह, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. संगीतप्रेमी व रसिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
‘माणिक मोती’ या कार्यक्रमातून पद्मश्री माणिक वर्मा यांच्या संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाला सांगीतिक मानवंदना अर्पण करण्यात येणार असून, त्यांच्या गाजलेल्या गीतांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा