हुमरमळा (वालावल) ग्रामस्थांकडून आमदार वैभव नाईक यांचा सन्मान
गेल्या दहा वर्षांतील विकासकामांना ग्रामस्थांकडून उजाळा; महिला उद्योजिका उमा निर्गुण आणि देवस्थान कमिटीवर निवड झालेल्या किशोर पेडणेकर यांचाही गौरव
कुडाळ : प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी गेल्या दहा वर्षांत हुमरमळा (वालावल) गावासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने गावात विविध विकासकामे मार्गी लागली. या विकासकामांची आठवण करून देत गावभेट कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामस्थांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे वैभव नाईक भारावून गेले.
आमदार वैभव नाईक यांनी वालावल पंचायत समिती मतदारसंघात गावभेट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये चेंदवण, वालावल आणि हुमरमळा येथे ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्यात आला. या दौऱ्याला ग्रामस्थ आणि शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कवठी येथे शिवसैनिकांनी मोठ्या जल्लोषात वैभव नाईक यांचे स्वागत केले. शिवसैनिकांना धीर देणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याविषयी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. त्यानंतर जनवाडी येथील मळ्यात कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांनी संवाद साधला. वालावल येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ते हुमरमळा येथे दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत गेल्या दहा वर्षांतील विकासकामांना उजाळा दिला.
यावेळी महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योजिका म्हणून कार्यरत असलेल्या उमा निर्गुण आणि लक्ष्मी यांचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच लक्ष्मीनारायण देवस्थान कमिटीवर हुमरमळा गावातून सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल किशोर महादेव पेडणेकर यांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, अर्चना बंगे, कुडाळ शहर युवासेना अध्यक्ष संदीप माडेश्वर, तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, तालुका प्रवक्ते बाळासाहेब पावसकर, अमरसिंह सावंत, रमा गाळवणकर, स्नेहलदीप सामंत, शरद वालावलकर, सोनाली मांजरेकर, सुरेश वालावलकर, पंढरी गाळवणकर, नाथा राणे, संजना गुंजकर, हेमांगी कद्रेकर, सुमित परब, वैभव मांजरेकर, विजू पेडणेकर, अजित केसरकर, किशोर वालावलकर, पोलीस पाटील सुबोध सावंत, योगेश परब, जयसिंग मार्गी, सागर परब, प्रभाकर गुंजकर, शानो परकर, धनंजय परकर, पप्पू दळवी, संदेश जाधव, रमा मांजरेकर, विजय वालावलकर, नामदेव परब आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहलदीप सामंत यांनी केले.
