रेडी येथे जेष्ठ क्रिकेटपटूंची क्रिकेट स्पर्धा व स्नेहसंमेलनसोहळा

रेडी येथे जेष्ठ क्रिकेटपटूंची क्रिकेट स्पर्धा व स्नेहसंमेलनसोहळा

भिवती माता मैदान येथे हौशी कला क्रीडा मंडळ रेडी यांचे शिस्तबद्ध आयोजन

रेडी गावातील जेष्ठ खेळाडू श्री अमरेंद्र राणे यांच्या संकल्पनेतून व रेडीतील हौशी कला क्रीडा मंडळ यांच्या सहकार्याने आज रेडी गावात अवस्मरणीय जेष्ठ क्रिकेटपटूंची क्रिकेट स्पर्धा आणि स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले
सकाळी 11वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर सामने सुरु करण्यात आले. तसेच दुपारचे जेवणही प्रत्येक खेळाडूंना मैदानातच करून एक आगळावेगळ्या स्वरूपाचे स्नेहसंमेलन साजरे केले.


या स्पर्धेचे खास वैशिष्टय म्हणजे रेडी गावातील सुमारे नव्वद जेष्ठ क्रीडापटुंना मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच गावातील मान्यवरांना ही सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी रेडी सरपंच सन्मा. श्री रामसिंग (भाई ) राणे, रेडी जि. प. सदस्य सन्मा. श्री प्रितेश राऊळ, उपसरपंच सन्मा. श्री नामदेव राणे, शिवसेना उपजि. प्रमुख सन्मा. श्री अजित सावंत, ग्रा पं सदस्य सन्मा. श्री श्रीकांत राऊळ, श्री संजय कांबळी, श्री आनंद भिसे, विनोद नाईक, जेष्ठ क्रिकेटपटू सन्मा. श्री अमरेंद राणे. श्री अभिजित राणे, रंजन मामलेकर, श्री जि. के राणे, अनिल पांडजी, संजय राऊत, अण्णा गडेकर, सुनिल राणे, पुरषोत्तम राणे, अनंत कांबळी, व अन्य खेळाडू उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा