You are currently viewing पानी पानी…
Oplus_16908288

पानी पानी…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पानी पानी..*

 

पानी पानी पानी करत “देस” झाया खाली

सरकारनी सांगी दिधं आम्ही नहित वाली..

आंघोयवर उनी बंदी पेवासाठे मारामार

पानीबिगर सांगा कसा चाली कारभार..

 

सांगी सांगी दमी गऊत ऐकत नही कोनी

पानी सांडतस घरेघर एकज कहानी

सांगनारा ठरस येडा ध्याने धरतत नही

थेंबथेंब पानीसाठे जिंदगानी बई..

 

नय सोडतंस भसाभसा पानी वाही जास

कितलातरी पानीना हो हुईजास नास

कामवाल्या बाया त्या बिलकूल ऐकतीत नही

तिसले वाटस म्हतारी हाई जरासी सटकी गयी..

 

गाड्या धोतस नईलायी आंगनम्हा तये

दखीदखी जीव देखा कितला मना बये

शॅावरना खाले उभा तासभर कोनी

नय चालू दाढी करतस भलती मनमानी..

 

थेंबथेंब करता जीव एकदिन तरसी जाई

रोजरोज खानीपडी आंघोयनी गोई

उघाडा रे डोया आते गयासे उनात प्रान

काटकसर करा रे पानीनी तुमले आन…

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा