You are currently viewing स्वभाव

स्वभाव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री रेखा काळे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*स्वभाव*

स्वभाव प्रत्येकाचा
असतो वेगवेगळा
वागण्या, बोलण्यातून
दिसून येतो सगळा !!

कोणी असतो अबोल
तर कोणी गपिष्ट
कोणी शांत, समंजस
आहे ‌कोणी गर्विष्ठ !!

काही नुसतेच स्वार्थी
परोपकारी काहीजण
उधळ्या, कंजूस,मतलबी
आगळावेगळा प्रत्येक जण ‌!!

स्वभाव ‌असतो ठरलेला
नाही बदलत लवकर
परिस्थितीनुसार बदल
ठरत असतो फायदेशीर ‌!!

आयुष्य जगताना आपले
सुस्वभाव कामी ‌येतो
धनदौलत, जमीन जुमला
सारेच ठेवून जातो !!

मानवता धर्म जपावा
माणुसकी अंगीकारावी
सुस्वभावाने साऱ्यांनीच
श्रद्धा,सबुरी ‌शिकावी. !!

रेखा काळे
अहमदनगर

प्रतिक्रिया व्यक्त करा