You are currently viewing गौरीनंदन

गौरीनंदन

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास समूह सदस्य दीपक पटेकर यांची गौरीनंदन गणेशाला वंदन करणारी अभंग रचना

देवांचा तू देव ! तू गौरीनंदन !!
प्रथम वंदन ! गणपती !!

पार्वती माता ही ! पिता महादेव !!
तूचि आदीदेव ! प्रथमेशा !!

रिद्धी सिद्धी कांता ! बंधू कार्तिकेय !!
उमेश तनय ! गजानन !!

उंदरावरी तू ! होऊनिया स्वार !!
करी चमत्कार ! विघ्नेश्वर !!

नैवेद्य दाविती ! लाडू मोदकांचा !!
आधार जनांचा ! विघ्नहर्ता !!

प्रतिवर्षी घरी ! मूर्ती तुझी बसे !!
मनी नित्य वसे ! लंबोदर !!

©(दिपी)
दीपक पटेकर,सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =