*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अहिराणी बोलीतील काव्यरचना*
*पानी उना.. पानी उना..*
पानी उना पानी उना झिमझिमझिम
भिंजाईगऊ बहिन मी वल्लीवल्लीचिंब..
हाड्याचिड्या दपीग्यात फडफडफड
देवबाप्पा गरजस दडदडदड..
आभायबी बोलसते कडकडकड
जीव मना करसवो धडधडधड..
ईजबाई लपकनी दडाडाडधाड
कापी उठनात दखानाहो दगडेपहाड..
झाडे करतस थरथर पाने सामसुम
शेपुटघालीन पयतस वांदरे धामधूम..
वल्लाचिंब हुईग्यात छपरेनिघरे
पंढायबी वसांडना नही धिरधरे..
पंढायम्हा पानी पडे धपधपधप
पानी उडायेत पोरे थपथपथप..
रस्ता व्हायनात जसा नदीनातो पूर
नावा सोड्यात आम्ही ग्यात दूरदूरदूर..
पानी उना पानी उना झिमझिमझिम
भिंजाई गऊ बहिनमी वल्लीवल्लीचिंब..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
