You are currently viewing देवबाग येथील जळीत घराच्या कुटुंबासाठी मनसे नेते परशुराम उपरकर यांची मदत

देवबाग येथील जळीत घराच्या कुटुंबासाठी मनसे नेते परशुराम उपरकर यांची मदत

मदत नव्हे ही तर आमची सामाजिक बांधिलकी ;अमित इब्रामपूरकर

देवबाग येथील गेलीरीन फर्नांडिस यांच्या घराला आग लागून लाखो रुपयांची हानी झाल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी आज तातडीने देवबागला धाव घेत पाहणी केली व फर्नांडिस कुटूंबियांना जिवनावश्यक मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या वतीने जिवनावश्यक वस्तुंचे वाटप अमित इब्रामपूरकर यांनी करत धीर दिला.

यावेळी मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, मनविसेचे देवबाग विभागअध्यक्ष प्रतिक कुबल,गुरु तोडणकर, प्रसाद बापार्डेकर, प्रथम देऊलकर हे उपस्थित होते. यावेळी जळीतग्रस्त फनांडिस कुटुंबियांची आपुलकीने विचारपूस करीत मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी फर्नांडिस कुटुंबियांना धीर दिला. यावेळी फर्नांडीस कुटुंबियांनी आगीच्या भक्ष्य स्थानी पडलेल्या वस्तूंची माहिती दिली. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी आणलेल्या अन्न धान्य फळ फळावर व इतर जीवनावश्यक साहित्य फर्नांडिस कुटुंबियांना देऊन मदतीचा हात दिला. सामाजिक बांधीलकीतून मनसेने ही मदत केली असून समाजातील दानशूर व्यक्तींनी फर्नांडिस यांना मदत करावी तसेच शासनस्तरावर मदत मिळवून देण्यासाठी मनसे प्रयत्न करील असे अमित इब्रामपूरकर यांनी सांगितले. मनसे नेते आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी भ्रमणध्वनी द्वारे फर्नांडिस कुटुंबियांची विचारपूस करीत त्यांना धीर दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − six =