You are currently viewing छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी शताब्दी निमित्त महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेची आगळीवेगळी आदरांजली

छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी शताब्दी निमित्त महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेची आगळीवेगळी आदरांजली

अमरावती

छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षात महाराष्ट्र शासनाच्या सारथी या स्वायत्त संस्थेने आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली आहे. छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य यानिमित्ताने अजरामर होणार आहे . त्यासाठी पुण्याच्या केंद्रीय कार्यालयातील संचालक श्री डी डी देशमुख यांनी नुकतीच अमरावतीला भेट दिली आहे. तसेच यासंदर्भात अमरावतीला सारथीचे विभागीय कार्यालयासाठी त्यांनी जागेची पाहणी केली. त्याचबरोबर अमरावती येथे 500 मुलांचे वस्तीगृह पाचशे मुलींचे वस्तीगृह व महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने पाहणी केलेल्या व शिफारस केलेल्या रहाटगाव व नवसारी येथील जागांची उपजिल्हाधिकारी श्री रणजीत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी देखील त्यांनी या प्रसंगी केली.अमरावतीला छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षात विभागीय कार्यालय मुला मुलींसाठी वस्तीगृह व महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र होत आहे ही अमरावती विभागासाठी आगळीवेगळी देण आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सारथीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अशोक काकडे व संचालक श्री डी डी देशमुख यांचे अभिनंदन केले पाहिजे .छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीचा मुख्य कार्यक्रम हा रविवार दिनांक 26 रोजी सकाळी ९ वाजता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या नियोजन भवनाच्या सुसज्ज इमारती मध्ये संपन्न होणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.त्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच सारथी चे संचालक व जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री अजय साखरे हे कार्यरत आहेत .नऊ वाजता रक्तदानानंतर होणाऱ्या किमान कौशल्यावर आधारित विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी त्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल .तसेच सारथीतर्फे जी मुले निवडल्या जातील त्यांचा प्रशिक्षणाचा पूर्ण खर्च सारथी करणार आहे. महाराष्ट्र शासनाने अमरावतीची निवड करून अमरावती करांच्या व अमरावतीतील विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ पंजाबराव देशमुख अकादमीचे संचालक प्रा.डॉ.नरेशचन्द्र काठोळे तसेच मराठा सेवा संघातर्फे श्री अरविंद गावंडे अश्विन चौधरी व श्री मनोहर कडू यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. प्रकाशनार्थ प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक डॉ.पंजाबराव देशमुख अकादमी अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 2 =