पालकमंत्री उदय सामंत यांची जानवली येथील डॉ. नागवेकर यांच्या कोविड केअर सेंटरला भेट…

पालकमंत्री उदय सामंत यांची जानवली येथील डॉ. नागवेकर यांच्या कोविड केअर सेंटरला भेट…

कणकवली :

पालकमंत्री श्री. उदय सामंत यांनी दौरा पाहणी दरम्यान जानवली येथील नव्याने उभारलेल्या डॉ. नागवेकर यांच्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. यावेळी कोविड केअर सेंटर मधील सोई सुविधा पाहून समाधान व्यक्त करुन म्हणाले, कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. कोरोना रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीतच आहे. तथापी या संकटाला सर्वानीच हातभार लावून हे संकट परतावयाचे आहे. ज्यांना कोरोना होवून गेला आहे. अशा व्यक्तींची मानसिक स्थिती बदलत असल्याचे निदर्शनास येत आहे.  अशा व्यक्तींना अतिताण येतो. या व्यक्तींचे  समुदेशन करणे अत्यंत आवश्यक आहे.  असे सांगून पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले डॉ. नागवेकर यांनी केलेले काम प्रशंसनिय तर आहेच. डॉ. नागवेकर यांनी उभालेल्या कोविड केअर सेंटर व त्यांनी केलेल्या कामासाठी उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा