You are currently viewing वागदे गावात अंगणवाडी इमारती मध्ये चोरीची घटना

वागदे गावात अंगणवाडी इमारती मध्ये चोरीची घटना

कणकवली

कलमठ गावात ९ बंद घरे फोडल्यानंतर काल रात्री वागदे गावातील अंगणवाडी इमारत चोरट्यांनी फोडली.
आज सकाळी ही बाब लक्षात आली. वागदे आर्यादुर्गा जिल्हा परिषद शाळा क्र. ५ व लगत असलेली अंगणवाडी केंद्र ८१९ या शाळांचे कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी शाळेतील वर्गांमध्ये प्रवेश केला.

वागदे आर्या दुर्गा जिल्हा परिषद शाळा क्र. ५ मधील चोरट्यांकडून कपाटे उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यात चोरण्यासारख्या कोणत्याही वस्तू सापडल्या नाहीत. दरम्यान इतर वर्ग खोल्यांचेही कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरटे तिथून फरार झाले. तेथील कोणत्या वस्तू चोरीस गेल्या याची पडताळणी केली असता मुख्याध्यापक यांनी केवळ गॅस बर्नर वरील पितळची जाळी अज्ञातांनी लंपास केल्याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे व पोलिस मनोज गुरव हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच वागदे गावचे सरपंच संदीप सावंत, उपसरपंच व ग्रामस्थ देखील घटनास्थळी दाखल झाले होते. वागदे आर्यादुर्गा प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या ही ४० तर अंगणवाडी मध्ये शिकणाऱ्या मुलांची संख्या १९ एवढी आहे. त्यामुळे या शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी होत आहे. याबाबत अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − six =