You are currently viewing एसटी गाड्यांचे पासिंग बेजबाबदारपणे..

एसटी गाड्यांचे पासिंग बेजबाबदारपणे..

आरटीओ पासिंग ला गाडी नेताना दुसऱ्या बसचे सुटे भाग वापरले जात असल्याचा आरोप

रत्नागिरी

उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून एसटी गाड्यांचे पासिंग करताना जबाबदारीचे भान राखले जात नाही. यातून प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येण्याची भीती असते. एसटी महामंडळाकडून बस पासिंगला नेताना कोणती चतुराई केली जाते याची पोलखोल मनसे राज्य परिवहन कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्यात अचानक तपासणी करून अशा बसेसची तपासणी करण्याची मागणी केली.

एसटी गाड्या उपप्रादेशिक परिवहनकडे पार्किंग साठी नेताना गाड्यांची सुटे भाग काढून नर्सिंग साठी नेण्यात आलेल्या गाड्यांना लावले जातात. यामध्ये पुढचे टायर, साईड आरसा, हेडलाईन, पार्किंग लाईट , बंपर, वायफर ब्लेड आदी सुट्ट्या भागांचा समावेश आहे. एकीकडे ही पोल-खोल करत असताना उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून एसटी महामंडळाच्या गाड्या पासिंग करून घेण्यासाठी अनेक फेऱ्या मारण्यास लावल्या जातात, असाही आरोप केला आहे.

मनसे राज्य परिवहन कामगार सेनेचे राज्याध्यक्ष हरी माळी, उपाध्यक्ष सुनील साळवी, बनी नाडकर्णी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, रोजगार संघटक रुपेश जाधव, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष चैतन्य शेंड्ये, उपतालुका अध्यक्ष महेंद्र मयेकर या नेत्यांनी या पासिंग प्रकरणात लक्ष घातले आहे. प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये आणि गाड्या सतत उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नेऊन एसटी चालकांची छळवणूक होऊ नये, यासाठी मनसे ची परिवहन कामगार सेवा आक्रमक झाली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या या नेत्यांनी असाही इशारा दिला आहे की, अशा असुरक्षित एसटीच्या गाड्या जिथे दिसतील तिथे अडवून ठेवण्यात येतील. जिल्हाधिकारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. यापूर्वी यास नेत्यांनी एसटीच्या मालवाहतूक गाड्यांची भांडाफोड केली आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहतूक अशा मालवाहतूक गाड्यांमधून वाहतूक करण्यास चालकांना भाग पाडले जाते.

मालवाहक गाडीचा अपघात होऊन देवरुख आगाराचे दोन चालक गंभीर जखमी झाल्याने मनसेची परिवहन कामगार सेना आक्रमक झाली आहे. त्याबाबतही आंदोलन करण्याचा इशारा यापूर्वी देण्यात आला आहे.

एकही बस बाहेर पडू देणार नाही: सुनील साळवी

असुरक्षित असलेल्या बसेस उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कोणतीही शहानिशा न करता पासिंग करून दिल्या जात आहेत. यातून चालक वाहकासह प्रवाशांच्या जीविताला धोका असतो. त्यामुळे हे प्रकार थांबले नाहीत, तर अशी एकही असुरक्षित बस आगारांमधून बाहेर पडू देणार नाही, असा इशारा राज्य उपाध्यक्ष सुनील साळवी यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + seventeen =