You are currently viewing रोटरी क्लब आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ युथ बांदाच्यावतीने मोफत धान्य वाटप

रोटरी क्लब आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ युथ बांदाच्यावतीने मोफत धान्य वाटप

क्षयरोग अंतर्गत निक्षयमित्र उपक्रमा अंतर्गत राबविला कार्यक्रम

बांदा

रोटरी क्लबच्या ११८ व्या वर्धापनदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ बांदा व रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांच्या तर्फे क्षयरोग ‘निक्षयमित्र’ या उपक्रमा अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ बांदाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, उपाध्यक्ष प्रमोद कामत, सचिव फिरोज खान, खजिनदार बाबा काणेकर, रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदाचे अध्यक्ष अक्षय मयेकर, उपाध्यक्ष संकेत वेंगुर्लेकर, सहसचिव मिताली सावंत तसेच रोटरी क्लब बांदाचे सदस्य आबा धारगळकर, सुधीर शिरसाट, आपा चिंदरकर, सुदन केसरकर, हनुमंत शिरोडकर, डॉ भालचंद्र कोकाटे, सीताराम गावडे, संदीप देसाई, शितल राऊळ, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी श्री कल्याणकर यांनी सर्व क्षयरोग लाभार्थ्यांना नोव्हेंबर २०२२ पासून प्रत्येक महिन्याचे धान्य पुरवले जाते व यापुढेही प्रत्येक महिन्यात पुरवले जाईल असे प्रतिपादन केले. तसेच रोटरॅक्ट क्लब रोटरी क्लबच्या खांद्याला खांदा लावून लोकसेवेत काम करेल असे मत रोटरॅक्ट अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी व्यक्त केले. आभार प्रदर्शन सुधीर शिरसाट यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा