You are currently viewing मनसे तर्फे 22 रोजी चौकुळ ग्रामपंचायत सभागृह येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

मनसे तर्फे 22 रोजी चौकुळ ग्रामपंचायत सभागृह येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

मनसे नेते परशुराम उपरकर यांची संकल्पना; सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यावा- विभाग अध्यक्ष रोशन गावडे

सावंतवाडी
मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून चौकुळ (सावंतवाडी) येथे ग्रामपंचायत सभागृह चौकुळ येथे सोमवार दि.22.०३.२०२१ रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.अत्याधुनिक संगणकीय ऑटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पद्धतीने होणार्‍या या शिबिरात ईसीजी तपासणी व रीपोर्ट कार्ड साठी नाममात्र १०० रुपये फी आकारण्यात येणार आहे.तरी या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन चौकुळ मनसे तर्फे विभाग अध्यक्ष रोशन गावडे यांनी केले आहे.
संपुर्ण शारीरिक तपासणी अक्युप्रेशर व फिजिओ तपासणी होणार्‍या या शिबिरात हृदय व मेंदुच्या रक्त वाहिन्यांची कार्यक्षमता,ECG रिपोर्ट,सफेदपेशी कोलॅजन मॅट्रीक्स,लिव्हर कार्यक्षमता ब्लड शुगर,हृदय व मेंदुच्या पल्स,पचन संस्थेची कार्यक्षमता,मिनरल्स,चॅनल्स व कोलॅटरल्स,पित्ताक्षय जिवनसत्व,रक्तातील चरबीचे प्रमाण,स्वादुपिंड,अॅमिनो अॅसिड,मोठ्या आतड्यांचे आरोग्य,मुत्रपिंड, को-एंझाईम्स,थायरॉइड कार्यक्षमता,फुफ्फुस,अंत:श्राव प्रणाली,पल्स ऑक्सिमीटर,रक्तवाहिन्या,रोग प्रतिकारक प्रणाली,बेसिक फिजिकल क्वॉलिटी,हाडांचे विकार,रक्तातील हेवी मेटल,ट्रेस मिनरल्स,हाड खनिज घनता,डोळ्यांचे आरोग्य,लहान हाडांचे विकार,अॅलर्जी,प्रोस्टेट,हाडांचे आरोग्य, त्वच्या व त्वचेसंबंधित घटक,स्त्रियांकरिता,ह्युमन टॉक्सिन, शरीर रचना विश्लेषण, गायनेकोलिजी, लठ्ठपपणा,मासिक पाळी, स्तनाचे विकार आदींची तपासणी होणार आहे.
सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत हा शिबिर चालणार असून गावातील जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =