You are currently viewing प्रभाग क्र. ४ मधील रस्त्यांच्या कामांना ठेकेदारांनी सुरुवात न केल्यास राजू बेग यांचा 26 रोजी उपोषणाचा इशारा

प्रभाग क्र. ४ मधील रस्त्यांच्या कामांना ठेकेदारांनी सुरुवात न केल्यास राजू बेग यांचा 26 रोजी उपोषणाचा इशारा

प्रभाग क्र. ४ मधील रस्त्यांच्या कामांना ठेकेदारांनी सुरुवात न केल्यास राजू बेग यांचा 26 रोजी उपोषणाचा इशारा

सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर

सावंतवाडी

सावंतवाडी नगरपरीषद प्रभाग क्र. ४ मधील नमूद केलेली कामे अद्याप सुरु करण्यात आलेली नाहीत.

1) दत्तनगर कॉलनीमधील सामंत घर ते परुळेकर घरपर्यंत,

2) झिरंग टेमकर घर ते मोजेस घरापर्यंत

3) गोवेकर कॉलनी

4) अभिषेक बावकर घराकडील रस्ता

वरील चारही कामांची वर्क ऑर्डर दिनांक ३०/११/२०२३ रोजी देण्यात आलेली आहे. तरी अद्यापपर्यंत मक्तेदारांनी सदर कामे चालू न केल्याने सदर भागातील नागरिकांना नाहक त्रास होत आहे. सदर संबंधित मक्तेदारांना त्वरीत कामे सुरु करण्याचे आदेश देण्यात यावेत. अन्यथा माजी नगराध्यक्ष राजू बेग यांनी दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनी सदर भागातील नागरिकांना घेऊन आपले लक्ष वेधण्यासाठी नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण करावे लागेल असा इशारा सावंतवाडी मुख्याधिकारी यांना प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + 18 =