You are currently viewing आमदार दीपक केसरकर गोरगरिबांचा नेता

आमदार दीपक केसरकर गोरगरिबांचा नेता

कणकवलीतील तरुणांकडून कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न निषेधार्ह

सावंतवाडी मतदार संघाचे शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तीमत्त्व, गोरगरीबांचा नेता आमदार दीपकभाई केसरकर यांच्या कार्यालयावर जो हल्ल्यांचा प्रयत्न केला गेला तो पोलीसांच्या कर्तव्यदक्षपणामुळे नाकाम करण्यात आला. सदरचा प्रकार हा चुकीचा व दुर्दैवी आहे. असे मत जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी व्यक्त केले आहे.
सावंतवाडी मतदार संघ हा शांतताप्रिय मतदारंघ असल्याने आपला रोष अशा पद्धतीने व्यक्त न करता, वर्तमानपत्र, सोशल मिडीया सारख्या माध्यमातून झाला असता तर चांगला होता. भाईंची ओळख शांत, संयमी व्यक्तीमत्त्व आहेत. त्यामुळे भाईंबद्दल कोणीही वाईट बोलत नाहीत. भाई सावंतांनंतर विधानसभेत अभ्यासू भाषण करणारा भाईंसारखा दुसरा नेता नाही. असे कोणीही समजून नये की भाईंच्या पाठीमागे कोणीही नाही. आजही भाईंना मानणारा समाजातील सर्व स्तरावरल एक मोठा वर्ग आहे. भाईंच्या बाबतीत जर कोणताही त्रास झाला तरीही लोकि मतपेटीतून त्याला उत्तर देतात. अशा अप्रिय घटनेचा भविष्यात मोठा परिणाम होणारा आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधीत नाही. त्यामुळे अशा प्रकारची घटना पुन्हा होऊ नये अशी मी त्यांना विनंती करतो. कारण सावंतवाडीची संस्कृती वेगळीच आहे. ती तशीच रहायला हवी. शांततेत मोर्चा, रॅली काढणे हा घटनेने दिलेला अधिकार आहे. परंतु त्याला कुठलेही गालबोट लावू नये याची सर्वांनीच काळजी घ्यावी व जिल्ह्यात शांतता राखावी, असे आवाहन मंगेश तळवणेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − twelve =