You are currently viewing दबंग नगराध्यक्ष संजू परब…

दबंग नगराध्यक्ष संजू परब…

जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली..

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूचा महापूर येत असतो, तसेच गेल्या काही वर्षात मटक्यासारखा धंदा तर उजळ माथ्याने सुरू आहे, गुटखा आणि ड्रग्स सुद्धा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात विकले जात आहेत. सावंतवाडीतही मटका, दारू आणि अमलीपदार्थांची विक्री होत असल्याने तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊन बरबाद होऊ लागली आहे.
सावंतवाडीचे नगराध्यक्ष हे सावंतवाडीत वाढलेल्या अवैद्य धंद्यांच्या मागे हात धुवून लागले आहेत. अवैद्य धंद्यांवर कारवाईची मागणी करताना कोणत्या पक्षाचे लोकप्रतिनिधी त्या धंद्यांमध्ये गुंतले आहेत याचाही विचार न करता सरसकट कारवाई करण्यासाठी त्यांनी पोलिसांच्या विरोधात आवाज उठविला. पोलिसांकडून सावंतवाडीतील गैर धंद्यांना लगाम घातला जात नाही म्हणून जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना दारूच्या बाटल्या कुरियर करण्याची भाषा सुद्धा केली.
आजपर्यंत कुठल्याही नेत्याने अवैद्य धंदे बंद करण्यासाठी पोलिसांना आव्हान दिले नव्हते परंतु संजू परब यांनी जोरदार आवाज उठविल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तालुकास्तरावर कारवाई करण्याचे आदेश देत, सावंतवाडीतील गैरकानुनी दारू धंदे, मटका यांच्यावर छोट्या मोठ्या कारवाया सुरू केल्या. त्यातून दोन मटक्याच्या राजांना उचलण्यात आले. गेली काही वर्षे बिनदिक्कत सुरू असलेल्या अवैद्य धंद्यांवर संजू परब यांच्यामुळेच संक्रांत आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीची दारू राजरोसपणे वाहतूक केली जाते, तसेच भेसळ करून महाराष्ट्राचे लेबल लावून विकली जाते. लाखो रुपयांची उलाढाल दिवसाकाठी मटक्याच्या व्यवहारातून होते, त्यातूनच खाकीला दिवसाला ५००००/- रुपयांचा हफ्ता दिला जातो, याची पोलखोल संजू परब यांनी केल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस खाते अडचणीत आले. त्यामुळेच वरिष्ठांच्या रडारवर आलेले जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांचा कार्यकाळ पूर्ण न होताच अचानक काल रात्री उशिरा त्यांच्या बदलीचे आदेश राज्य गृह विभागाकडून काढण्यात आले.
संजू परब यांनी पोलिसांवर थेट आरोप केल्यामुळे पोलीस अधिकारी आणि अवैद्य धंदेवाल्यांचे अंतर्गत संबंध असल्याचे जाहीर झाले आहे व त्याच अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक तात्काळ हटविले अशी चर्चा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 9 =