You are currently viewing सावंतवाडीत २१ एप्रिलपासून शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण…

सावंतवाडीत २१ एप्रिलपासून शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण…

सावंतवाडीत २१ एप्रिलपासून शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण…

सावंतवाडी

अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या वतीने उन्हाळी सुट्टीनिमित्त ‘शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २१ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार आहे.
यावेळी कोल्हापूर येथील फिरंगोजी शिंदे आखाड्याचे संचालक वस्ताद प्रमोद पाटील यांच्या अनुभवी टीमसह प्रत्येक शिबिरार्थीना वैयक्तिक मार्गदर्शनाची संधी उपलब्ध होणार आहे. शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण शिबीरात लाठी-काठी, तलवार, दांडपट्टा प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षण शिबिरासाठी प्रवेश मर्यादित असून प्रथम येणाऱ्यांना प्रथम संधी या तत्वावर प्रवेश दिला जाईल. मात्र अपेक्षित शिबिरार्थी संख्या पूर्ण झाल्यावर प्रवेश दिला जाणार नाही. तसेच नावनोंदणी व अधिक माहितीसाठी किशोर चिटणीस(9421073383) किंवा राजू केळुसकर (7083974400) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अभिनव फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डाॅ. प्रसाद नार्वेकर आणि सचिव अण्णा म्हापसेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा