You are currently viewing उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार….

उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार….

राजघराणे आणि शासन पातळीवर पाठपुरावा सुरू आहे-आम. दिपक केसरकर

सावंतवाडी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार असून राजघराणे आणि शासन पातळीवर यासाठी पाठपुरावा सुरू आहे असे माजी पालकमंत्री आमदार दिपक केसरकर यांनी सांगितले.
सावंतवाडी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मंजूर करून त्याचे भूमिपूजन उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात करण्यात आले होते. मात्र मागील काही महिने जमीन वाद न्यायालयात असल्याने या इमारतीचे काम होऊ शकले नाही.
या प्रश्नाबाबत कायदेशीर बाबींची पडताळणी करून राजघराणे आणि शासन पातळीवर सकारात्मक पाठपुरावा सुरू असून या कायदेशीर बाबी पूर्तता झाल्यानंतर या हॉस्पिटलचे काम सुरू होईल असे आमदार केसरकर त्यांनी सांगितल.

राजघराण्याने जमीन देण्याबाबत काही शर्ती ठेवल्या आहेत त्याची पडताळणी शासनाकडून केली जात आहे. जमिनी बाबत न्यायालयात खटला सुरू आहे त्याबाबतही कायदेशीर बाजू विचारात घेतली जात आहे. त्यामुळे शासन पातळीवर या बाबतीत लवकरात लवकर निर्णय व्हावा म्हणून माझा प्रयत्न सुरू आहे, असे आमदार केसरकर म्हणाले. राजघराण्याने जमीन देण्याबाबत साकारात्मक भुमिका घेतली आहे. मात्र काही तांत्रिक बाबीची पूर्तता करून या ठिकाणी शासनाला जमिनी बाबतचा प्रश्न सोडवावा लागेल तसेच न्यायालयातील खटला देखील मागे घ्यावा लागेल त्यानंतरच या प्रश्नाबाबत पूर्तता होईल असे आमदार केसरकर यांनी सांगितले.
आपण याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदींशी चर्चा करून पाठपुरावा करत असल्याचे केसरकर म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. आतादेखील परतीच्या पावसाने आणखी नुकसान केले आहे त्यामुळे प्रशासन पातळीवर पंचनाम्याचे काम सुरू आहे. पंचनामे एकत्रित आल्यानंतर शासन धोरणात्मक निर्णय जाहीर करेल असा विश्वासही आमदार केसरकर यांनी व्यक्त करून आपण त्यासाठी देखील पाठपुरावा करत आहे असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + 8 =