कुडाळ तालुक्यातील शाळांना अखेर सेस अनुदान प्राप्त…

कुडाळ तालुक्यातील शाळांना अखेर सेस अनुदान प्राप्त…

प्राथमिक शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

कुडाळ

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना वीजबिल भरण्यासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून मंजूर झालेले अनुदान कुडाळ तालुका वगळता जिल्ह्यातील सर्व शाळांना गेल्या महिन्यातच प्राप्त झाले होते. दिनांक १९ जानेवारी रोजी जिल्हा कार्यालयाकडून कुडाळ तालुक्याला वर्ग झाले होते.परंतु १६ मार्च पर्यंत सदर अनुदान जमा न झाल्याने शाळांचे वीजबिल थकीत राहिल्याने वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली होती, याबाबत नाराजी व्यक्त करत प्राथमिक शिक्षक भारतीने शिक्षणाधिकारी यांचे लक्ष वेधले होते.

या पाठपुराव्यानंतर दिनांक १९ मार्च रोजी जिल्हा सेस फंडाची रक्कम कुडाळ पंचायत समिती शिक्षण विभागाने तातडीने तालुक्यातील शाळांच्या खात्यावर जमा केली.प्राथमिक शिक्षक भारतीने महत्त्वाच्या प्रश्नाबाबत यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल कुडाळ तालुक्यातील शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. अशी माहिती शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष श्री.संतोष पाताडे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा