You are currently viewing कोकणात बांबू लागवडिला मोठी संधी…

कोकणात बांबू लागवडिला मोठी संधी…

जिल्हा परिषद सदस्य प्रशिक्षणात अध्यक्ष म्हापसेकर यांची माहिती

मालवण 

जिल्हा परिषद सदस्य ५० आहेत. त्यामुळे किमान ४० सदस्य प्रशिक्षणाला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. शिवसेनेचे एकही सदस्य आलेले नाहीत. ते ठरवून आले नाहीत का ? ते समजू शकलेले नाही. आयुष्यात प्रशिक्षण महत्वाचे असते. जिल्ह्यात बांबू लागवडीला मोठी संधी आहे. कोकणात याचा फायदा करून घेतला पाहिजे. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १०० महिलांसाठी तलंग योजना आणली आहे. या माध्यमातून महिला आर्थिक सक्षम करताना जिल्ह्यातील मुलांना कुपोषन मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यानी मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील जिल्हा परिषद सदस्य प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना केले. जिल्हा परिषद शेष फंडातून जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निधिची तरतूद करण्यात आली होती. हे प्रशिक्षण शुक्रवारी मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील साईसागर रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन अध्यक्ष म्हापसेकर यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील, मालवण सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, वित्त व लेखा अधिकारी मदन भीसे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ दिलीप शिंपी, मालवण गटविकास अधिकारी जे पी जाधव, सरपंच आबा कांदळकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर यानी, जिल्हा परिषदेच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद प्रतिवर्षी आर्थिक तरतूद करण्यात येते. यावर्षीही तसे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रामीण विकास, बांबू लागवड व जलजीवन मिशन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रेश्मा सावंत, संजना सावंत, उन्नती धुरी, श्वेता कोरगांवकर, मनस्वी घारे, सावी लोके, शर्वाणी गांवकर, श्रिया सावंत, समिधा नाईक, मानसी जाधव, संजय देसाई, अनघा राणे, जेरॉन फर्नांडिस, रविंद्र जठार, विष्णुदास कुबल, गणेश राणे, मालवण पंचायत समिती सदस्य मनीषा वराडकर, गायत्री ठाकुर, विनोद आळवे, अशोक बागवे, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील स्वयंरोजगाराच्या नवीन वाटा या विषयावर प्रशिक्षण देताना मिलिंद पाटील यानी, बांबू लागवडीला १९९५ पासून प्राधान्य सुरु झाले आहे. ही लागवड कमी मेहनतीत जास्त आर्थिक लाभ मिळतो. सिंधूदुर्ग जिल्ह्यात सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या भागात बांबू लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे, असे सांगत विस्तृत माहिती दिली. भगीरथ प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर यानी, राजकीय लोकांनी काम करताना सर्वसामान्य व्यक्तीना केंद्रित करून विकास साधला पाहिजे. त्यासाठी धोरण बदलले पाहिजे, असे आवाहन उपस्थित लोकप्रतिनिधीना केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 1 =