…अन्यथा आक्रोश आंदोलन

…अन्यथा आक्रोश आंदोलन

माजी उपनगराध्यक्ष तानाजी वाडकर यांचा पत्रकार परिषदेत इशारा

सावंतवाडी

रवी जाधव यांनी लावलेला स्टॉल हटवताना राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची पूजेला लावण्यात आलेली प्रतिमा व मूर्ती शासकीय सोपस्कार न करता हटवून मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून, त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई न केल्यास येत्या आठ दिवसात आक्रोश आंदोलन करू असा इशारा माजी उपनगराध्यक्ष तानाजी वाडकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.. यावेळी रवि जाधव सुनील पेडणेकर, समीर वंजारी, संजय पेडणेकर सोनम जाधव आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा