You are currently viewing सावंतवाडीत महिला व मुलींच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण वर्ग
Oplus_16908288

सावंतवाडीत महिला व मुलींच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण वर्ग

नगराध्यक्षा श्रद्धा लखम सावंत भोंसले यांची प्रशिक्षण केंद्राला भेट

महिला बालकल्याण सभापती दीपाली भालेकर यांच्या आयोजनाचे कौतुक; २०० हून अधिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील महिला व मुलींच्या कौशल्य विकासासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत फोर व्हीलर व टू व्हीलर ड्रायव्हिंग, अ‍ॅडव्हान्स फॅशन डिझाईन, केटरिंग यांसह विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षण शिबिराला सावंतवाडीतील महिला व तरुणींकडून २०० हून अधिक संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

या प्रशिक्षण शिबिराच्या ठिकाणी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा लखम सावंत भोंसले यांनी विशेष भेट देऊन प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांचे मनोबल वाढवून त्यांना कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा लखम सावंत भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी शहरात महिला व मुलींसाठी विविध कल्याणकारी आणि कौशल्यवर्धक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार आहेत.

यावेळी महिला व बालकल्याण सभापती सौ. दीपाली भालेकर उपस्थित होत्या. महिला व मुलींसाठी विविध प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केल्याबद्दल नगराध्यक्षा सौ. श्रद्धा लखम सावंत भोंसले यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. महिला व बालकल्याण समितीच्या या पुढाकारामुळे शहरातील महिलांना नवीन कौशल्ये आत्मसात करून स्वावलंबी होण्याची संधी उपलब्ध झाली असून, या उपक्रमाबद्दल महिलावर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा