You are currently viewing कणकवली, फोंडाघाटमध्ये धुके आणि दवाची चादर; थंडीची चाहूल

कणकवली, फोंडाघाटमध्ये धुके आणि दवाची चादर; थंडीची चाहूल

कणकवली, फोंडाघाटमध्ये धुके आणि दवाची चादर; थंडीची चाहूल

सकाळी मॉर्निंग वॉकसाठी नागरिक स्वेटरमध्ये; दिवसभर ढगाळ वातावरण, संध्याकाळी बोचरी थंडी

कणकवली :

कणकवली आणि फोंडाघाट परिसरात सकाळी सर्वत्र धुके आणि दव पडल्याने थंडीची चाहूल लागली आहे. सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी स्वेटरचा आधार घेतला असून, दवापासून बचावासाठी काहींनी छत्र्यांचाही वापर केला. सकाळचे वातावरण चेरापुंजीसारखे भासत होते.
दिवसभर ढगाळ वातावरण, तर संध्याकाळपासून बोचरी थंडी अनुभवायला मिळत आहे. या बदललेल्या वातावरणाचा श्री राधाकृष्ण मंदिरातील सकाळच्या काकड आरतीवर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही. या परिसरातील धुके आणि दवाने नटलेली सकाळची निसर्गरम्य दृश्ये अजित नाडकर्णी यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा