कणकवली (प्रतिनिधी) :
कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ‘जलसिंधु’ निवासी संकुलाचे भूमिपूजन शुक्रवारी १९ जूनला सकाळी ११ वाजता पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या हस्ते कलमठ येथे होणार आहे.
यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार ॲड. निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार प्रमोद जठार, तसेच आमदार दीपक केसरकर, आमदार डॉ.निलेश राणे,मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश, मुंबई मिलिंद नाईक, जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग रविंद्र खेबूडकर, तसेच पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर उपस्थित राहणार आहेत.
