You are currently viewing कविता गायन स्पर्धेत कासार्डेचा अभिषेक देवरुखकर तालुक्यात प्रथम..

कविता गायन स्पर्धेत कासार्डेचा अभिषेक देवरुखकर तालुक्यात प्रथम..

कासार्डे

अखिल कणकवली तालुका प्राथमिक शिक्षक संघ आयोजित तालुकास्तरीय सहभिनय मराठी कविता गायन स्पर्धेत जि.प. प्राथमिक शाळा कासार्डे- जांभुळवाडी शाळेतील इ.१लीचा विद्यार्थी कु. अभिषेक देवेंद्र देवरुखकर याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
शिक्षक संघातर्फे ही स्पर्धा जूलै महिन्यात व्हिडिओद्वारे इ.१ली ते इ.७वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली होती. इयत्ता १ली गटातून कु.अभिषेकने बाजी मारली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांला शाळेच्या शिक्षिका श्रीम.एस.आर.हजारे, श्रीम.एस.एस. मुंडले तसेच त्यांचे वडील प्रा.देवेंद्र देवरुखकर, आई सौ.सरीता देवरूखकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. त्याचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच शाळेच्या शिक्षकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. कु. अभिषेकचे कासार्डे परिसरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − one =