You are currently viewing तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड!

तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड!

तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड!

सावंतवाडी

जिल्हा क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
यामध्ये 14 वर्षे खालील मुले या वयोगटात मंथन पास्ते यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तसेच मित पडवळ याने पाचवा क्रमांक तर एहफाज शेख याने सहावा क्रमांक मिळवला. 17 वर्षे खालील मुले या वयोगटात रेहान दुर्वेश याने पाचवा क्रमांक पटकावला तर 19 वर्षे खालील मुले यामध्ये मनुराज महाले याने चौथा क्रमांक व अथर्व केनवडेकर याने पाचवा क्रमांक मिळवला. तसेच 17 वर्षे खालील मुली यामध्ये तनिष्का पडवळ हिने चौथा क्रमांक पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे.विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी कोणत्याही अकॅडमी द्वारे प्रशिक्षण न घेता केवळ घरी व शाळेत जिद्दीच्या जोरावर सातत्याने सराव करून मेहनतीने यश संपादन केले असून त्यांच्या स्वप्रयत्नांचे व अथक परिश्रमांचे हे फलित आहे.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, मंडळाचे संचालक श्री. दिलीप देसाई, सहाय्यक-संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर, क्रीडाशिक्षक श्री. भूषण परब तसेच प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा