You are currently viewing परजिल्ह्यातील आरटीओ विरोधात राष्ट्रवादी आक्रमक

परजिल्ह्यातील आरटीओ विरोधात राष्ट्रवादी आक्रमक

कारवाई थांबवा: अन्यथा आरटीओ कार्यालयाला घेराव घालण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवीचा इशारा

सावंतवाडी

परजिल्ह्यातून दोन दिवसांपासून आरटीओची पथके येऊन जिल्ह्यातील मालवाहक वाहनांना, डंपर व्यवसायिकांना नाहक त्रास देत आहेत. त्यांच्यावर कारवाई करत भरमसाठ दंड वसूल केला जातेय. कोरोनामुळे व्यवसायिक आधीच अडचणीत असताना अशा प्रकारे कारवाई करत व्यवसायिकांच्या पोटावर पाय आणला जातोय. गाड्यांचे हाप्ते देखील थकित असल्यानं या कारवाईमुळे व्यावसायिक अधीकच अडचणीत आलेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने ही कारवाई तात्काळ थांबवावी असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीन दिलाय. ही कारवाई न थांबवल्यास आरटीओच्या अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा