You are currently viewing भातशेती व इतर पिकांचे पावसा अभावी नुकसान

भातशेती व इतर पिकांचे पावसा अभावी नुकसान

भातशेती व इतर पिकांचे पावसा अभावी नुकसान;

पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी-नगरसेविका ज्योती रमाकांत जाधव

दोडामार्ग

सध्या राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाअभावी शेतीतील पिके करपून जात असून,विशेषत:भातशेतीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे,त्यामुळेशेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने संबंधित यंत्रणेमार्फत सर्व शेतांतील पिकांचे तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगरसेविका -सौ.ज्योती रमाकांत जाधव यांनी केली आहे.
पावसाअभावी पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम करणारे आहे,त्यामुळे पंचनाम्याच्या प्रक्रियेत कोणताही शेतकरी वंचित राहू नये,तसेच नुकसानभरपाई तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने आवश्यक कार्यवाही करावी,अशी मागणी त्यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा