*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्त्री शक्ती*
*पहिली माझी ओवी गं*
मराठी मातीला
वंदन करुनी तिजला एड
टिळा भाळी लावीला
*दुसरी माझी ओवी गं*
जन्म देत्या माऊलीला
कुशीत तिच्या शिकलो आम्ही
मराठीच्या शब्दाला
*तिसरी माझी ओवी*
थोर माझ्या गुरूंना
अआ इ ई ची ओळख दिली
शाळेमध्ये शिकण्याला
*चौथी माझी ओवी ग*
शिवबाच्या जिजाऊला
संतांची शिकवण दिली
त्या थोर मातेला
*पाचवी माझी ओवी गं*
ज्योतिबाच्या सावित्रीला
वसा शिक्षणाचा देवुनी
सन्मान दिला महिलेला
*सहावी माझी ओवी गं*
माय माझी रमाईलां
दिन दुबळ्याची माऊली
बाबासाहेबांच्या पत्नीला
*सातवी माझी ओवी ग*
धरणी माता भूमीला
अन्न धान्याची रास भरवी
माझ्या काळया आईला
*शीला पाटील . चांदवड.*
