You are currently viewing “आठवणी”

“आठवणी”

पाऊस सुरू झाला की,
येतात त्या आठवणी…
मनाच्या खिडकीवर डोकावून पहायला…
जसे थेंब पावसाचे जमतात,
गवताच्या पातीवर..
मोती होऊन जगायला…

कितीही रोखा त्यांना..
नसते तमा कुणीतरी पाहण्याची…
त्या येतात,
मनाला गुदगुल्या करतात,
गालातल्या गालात हसवतात..
कधी खळखळून हास्याचे कारंजे फुलवतात..
बहरलेल्या मोगऱ्यासारखे..
शरीराला सुगंधित करून जातात.
काही क्षणांच्या सहवासाने.

मध्येच कधितरी,,
डोळ्यांच्या पापण्याही ओलावतात…
कधी अश्रू मोती होऊन,
गालावर ओघळतात…
अळवावरच्या पाण्याच्या थेंबासारखे…
हसतच क्षणात नाहीसे होण्यासाठी.
तरीही मागे राहतो,,,
जातानाचा तो पुसटसा माग…
एक आठवण बनायला…

आठवणी…
सरलेल्या आयुष्यातल्या..
त्या असतात..
म्हणून तर..अर्थ असतो,
उरलेल्या जीवनाला..

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + eighteen =