*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्राजक्त मनीचा*
कुणास ठाऊक कसा, बहर तो ओसरला प्राजक्ताचा
ना शिंपला रुख्मिनी दारी, ना शिंपला सत्यभामेच्या घरा
नुसताच नव्हता तो फुलांचा, तो ओळखीच्या अनेकानेक फुलांचा
जागविल्या आठवणींचा नि,आठवांच्या जागरांचा
तो उन्माद त्या आकांक्षा, ती गवसणी घातल्या क्षितिजांची
त्या ओळखीच्या खुणा ,अन हुरहूर लागल्या मानसीची
ओसरला आहे, प्रियेच्या मदमस्त धुंद प्रितीचा सुवास तो
डोळ्यांवर हात ठेवूनि, वाट तिची पाहण्याचा फिटला अट्टाहास तो
प्रतीक्षा की तितीक्षा ती,खुणाविते लेख ललाटीचा
ओझरताही पाहतो आज,भाग्य मज आहे खूणाविता
पण,कुणास ठाऊक कसा, कहर आज उठलेला
आठवणींच्या आठवांचा, काहूर आसुसल्या सरत्या क्षणांचा
मदमस्त मस्तीत, का कहरास घाबरलो मी
मस्तीत जगलो मनाजोगे, रिक्त आयुष्य भरण्या पलीकडले जगलो मी
जगलो सुखेनैव,का दुःखास घाबरलो मी
असतील नसतीलही,का तयांचे भय ही बाळगायाचे मी
अरे,फिकीर कुणा आहे इथे, कुणाला काय द्यायचे की घ्यायचे आहे
दिल्या घेतल्या वचनांची,आहे कुणा वंचना इथे
चल,दिले वचन! पण आहे का ते पाळायचे ?
पाळण्या वचनांचा, हा अट्टाहास वेडा तरी का बाळगायचे ?
दिल्या घेतल्या वचनातूनी ,आहे मुक्त आज मी
नियती तुला माझ्या वचनातूनी ,चल!केले मुक्त आहे आज मी
जगण्यास होते मुक्त अंबर, अंबरी विहरलो मी
नभात माझ्या चांदण्यांच्या, प्रकाशी न्हाअलो मी
—–राजा जोशी
9823687519
〰️〰️,🌸,〰️〰️
