कोनाळ येथे वनराई बंधारा उभारणीसाठी लोकसहभाग
पंचायत समिती सदस्य सौ. सायली स्वप्निल निंबाळकर यांचा प्रत्यक्ष श्रमदानातून सहभाग
कोनाळ :
पाणी व्यवस्थापन आणि जलसंधारणाला चालना देण्यासाठी कोनाळ येथे वनराई बंधारा उभारणीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात कोनाळ पंचायत समिती सदस्य सौ. सायली स्वप्निल निंबाळकर यांनी ग्रामस्थांसोबत प्रत्यक्ष श्रमदान करत वनराई बंधारा उभारणीच्या कामात सहभाग घेतला.
या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मंडळ अधिकारी गवस मॅडम, विविध शासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक, शाळकरी विद्यार्थी, सरपंच सौ. अस्मिता गवस, उपसरपंच रत्नकांत कर्पे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजल पातळी वाढवणे तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी वनराई बंधारे व जलसंधारणाची कामे महत्त्वाची ठरतात. ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शासकीय यंत्रणेच्या लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून पाणी संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
💧 पाण्याचा प्रत्येक थेंब अडवूया…
🌱 पाणी जिरवूया…
🤝 लोकसहभागातून कोनाळचा जलसाठा समृद्ध करूया!
